आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामतदान केंद्रावर मद्याच्या नशेत हुज्जत घालणाऱ्याला मज्जाव करण्यास गेलेल्या पोलिसांची कॉलर पकडून शिवीगाळ करणाऱ्या आरोपीस अमळनेर जिल्हा न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
चाेपडा तालुक्यातील हातेड बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान सुरू होते. तेथे शरद खंडू रोकडे हा मद्याच्या नशेत मतदान करण्यासाठी आला. परंतु, त्याच्याकडे मतदान कार्ड नसल्याने त्यास मतदान अधिकाऱ्यांनी मतदान कार्ड घेऊन मतदान करा, असे सांगितले. मात्र, तो अधिकाऱ्यांशी हुज्जत घालू लागला. त्याने फोन लावून पत्नी व इतरांना बोलावून घेतल्याने वाद वाढला होते. मतदान केंद्राध्यक्षांनी तेथील पोलिस कॉन्स्टेबल रमेश शिवाजी खोपडे यांना वाद मिटवण्यास सांगितले. त्या वेळी शरद राेकडे याने पोलिस कॉन्स्टेबल रमेश खोपडे यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ केली. त्यांच्या गणवेशाची ओढाताण करून कॉलर पकडली. या बाबत चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या खटल्यात एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी रमेश खोपडे व महिला पोलिस कॉन्स्टेबल शीतल लोणे यांची साक्ष महत्वाची ठरली.
हजार रुपये दंड न भरल्यास एका वर्षांची शिक्षा या खटल्याचा तपास पोलिस निरीक्षक संदीप अराक व तत्कालीन उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी केला. जिल्हा न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी आरोपीस शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मतदान केंद्र व शासकीय कर्मचाऱ्यांशी बेशिस्त वागणूक केल्याने पाच वर्षांची शिक्षा व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. खटल्यात सरकारी वकील शशिकांत पाटील यांनी युक्तिवाद केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.