आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंब दिन विशेष:प्रेम, आदर, संवादाने 37 जणांचे कुटुंब एकसंघ; बोरकुंड येथील माळी कुटुंब म्हणते एकत्रित कुटुंबपद्धती जपली जावी

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकमेकांविषयी असलेले प्रेम, आदर व मुक्त संवाद हा एकजुटीचा आत्मा मानून धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील ३७ जणांचे माळी कुटुंब एकाच घरात गुण्यागोविंदाने नांदते आहे. दुकान व इतर पूरक व्यवसाय असले तरी शेती हाच या कुटुंबाचा प्रमुख आधार आहे. कुटुंबातील पुरुषांप्रमाणे महिलाही एकोपा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. संयुक्त कुटुंब पद्धती जपा आणि नाते टिकवा असा मोलाचा सल्ला माळी कुटुंबातील सदस्य सर्वांना देतात. जिल्हा परिषद सदस्य देविदास माळी हे या कुटुंबाचे प्रमुख आहे.

धुळे तालुक्यतील बोरकुंड येथील माळी कुटुंब एकोपा आणि संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे ओळखले जाते. केवळ बोरकुंडच नव्हे तर परिसरातील इतर गावे व नातलगांमध्येही या कुटुंबाचे नेहमीच कौतुक होते. एकत्र व एकाच छताखाली राहत असलेल्या या कुटुंबाच्या प्रमुख राणीबाई माळी व त्यांचे मोठे चिरंजीव देविदास माळी असले तरी कुटुंबात इतर सदस्यांनाही तेवढेच अधिकार आहे.

नात्यांतील गुंफण अतूट राहावी यासाठी पोषक वातावरण कुटुंबाने टिकवून ठेवले आहे. माळी कुटुंबाचा एकोपा आणि संयुक्त कुटुंब पद्धतीचा आत्मा परस्परांबद्दल असलेले प्रेम, आदर आणि मुक्त संवाद आहे. त्यामुळे ३७ जणांचे कुटुंब एकसंघ आहे. कुटुंबात देविदास माळी, त्यांचे बंधू भानुदास, दिनेश व राजेंद्र व त्यांचा परिवार आहे.

याशिवाय दोन सुना, आठ नातवंडे आहे. पाच वर्षाआतील सहा बालके तर एक बालिका आहे. कुटुंबातील दोघा मुलींचा विवाह झाला आहे. तर इतरांचे अजून शिक्षण सुरू आहे. सोयरीक व विवाह जुळवताना एकत्रित निर्णय घेतला जातो. कुटुंबातील सर्व सदस्य सण-उत्सव एकत्रित साजरा करतात. या कुटुंबातील तरुणांनाही संयुक्त कुटुंब पद्धत भावते. माळी कुटुंबाचा दिवस रोज भल्या पहाटेच सुरू होतो.

बातम्या आणखी आहेत...