आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:देगावच्या शेतकऱ्याची विहिरीमध्ये आत्महत्या

धुळे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथील ६२ वर्षीय शेतकऱ्याने शेत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. विक्रम सदा महिरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर कर्ज होते. ते फेडण्याच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती महिरे यांच्या नातेवाइकांनी दिली.

देगाव येथील विक्रम सदा महिरे शुक्रवारी सकाळी आठ वाजता शेतात गेले हाेते. रात्री आठ वाजले तरी ते परत आले नाही. त्यामुळे त्यांचा शोध सुरू झाला. त्या वेळी त्यांच्या आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर महिरे यांना शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी शिंदखेडा पाेलिस ठाण्यात नाेंद झाली.

बातम्या आणखी आहेत...