आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार:देशसेवा करताना वडिलांना वीरमरण आल्याने अभिमान वाटतो; अंत्यसंस्कारासाठी प्रचंड गर्दी

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
छाया : विठोबा माळी, कापडणे - Divya Marathi
छाया : विठोबा माळी, कापडणे

न्याहळोद येथील रहिवासी तथा सैन्य दलातील जवान मनोहर रामचंद्र पाटील यांना सोमवारी वीरमरण आल्याने त्यांच्यावर न्याहळोद गावात बुधवार रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनाला जनसागर उसळला. आठ वर्षाच्या कनिष्का या मुलीने मुखाग्नी दिला. माझे वडील जेवढे कुटुंबावर प्रेम करायचे तेवढेच प्रेम देशावर करायचे.

नेहमी मला देशसेवेचे धडे देत असत, वडिलांच्या जाण्यामुळे माझा मोठा आधार कायमचा निघून गेला आहे. मात्र माझ्या वडिलांना देशसेवा करताना वीरमरण आल्याने मोठा अभिमान वाटत आहे, अशा शोकसंवेदना तिने व्यक्त केल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.

भव्य तिरंगा रॅली, पुष्पवर्षाव
वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी गावासह आजी-माजी सैनिक, कापडणे, देवभाने, कौठळ, बिलाडी, तामसवाडी, विश्वनाथ, हेंकळवाडी, धनूर, धमाणे, नगाव येथून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांनी भव्य तिरंगा रॅली काढली होती. ट्रॅक्टरमधील पार्थिवावर घरांवरून पुष्पवर्षाव केला.

ऑपरेशन मेघदूतमध्ये सहभाग : मनोहर पाटील यांची सियाचीनमध्ये ऑपरेशन मेघदूतमध्ये कर्तव्य बजावत असताना प्रकृती खराब झाली होती. उपचार सुरू असताना सोमवारी निधन झाले. त्यांचे पार्थिव बुधवार रोजी सकाळी दहा वाजता न्याहळोद येथे आणण्यात आले. त्यानंतर गावातून अंत्ययात्रा काढली.

सहा महिन्यांनी होणार होते निवृत्त : मनोहर पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर नोकरी पुढे सुरू ठेवली होती. ६ महिन्यांनी निवृत्त होऊन घरी परतणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना वीरमरण आले.

बातम्या आणखी आहेत...