आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:15 हजार लाच मागणारा वनपाल आला जाळ्यात; पोलिसांची धडक कारवाई

धुळे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वन विभागाने पकडलेले वाहन सोडण्यासाठी १५ हजारांची मागणी करणारा वनपाल सुनील पाटील याला अटक झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

शहरातील एकाची पिकअप आहे. त्यावर त्यांचा मुलगा उदरनिर्वाह करतो. काही झाडे तोडल्यानंतर ती या पिकअपमधून नेली जात होते. त्यावेळी वनविभागाने पिकअप पकडली. त्यानंतर वनपाल सुनील आधार पाटील (वय ५७) यांनी पिकअप सोडण्यासाठी १५ हजारांची लाच मागितली. याबाबत संबंधित नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पडताळणीानंतर सुनील पाटील यांनी लाच मागितल्याचे समोर आले. कारवाई वेळी सुनील पाटील सावध झाले. त्यामुळे त्यांनी लाच स्वीकारली नाही. पण लाचेची मागणी केल्याबद्दल त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अनिल बडगुजर व पथकाने अटक केली.

पथकाकडून घरझडती
कारवाई केल्यानंतर एक पथक जुने धुळे परिसरातील त्यांच्या घरी गेले. पथकाने घरझडती घेतली पण काहीही आढळले नाही.

बातम्या आणखी आहेत...