आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:शिंदखेडा येथे श्रीराम, मारुती मंदिरास दिली सात किलोची पितळी घंटा भेट

शिंदखेडा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा येथील श्रीराम मारुती मंदिरात नारायण काशिनाथ गुरव यांच्याकडून ७ किलो वजनाची पितळी घंटा भेट देण्यात आली. बापू थेटे महाराज यांनी मंत्रोच्चारात पूजा केली.

दीपक देशमुख, सतीश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ५० मुलांचे वारकरी संप्रदायातील बाल पथक तयार झाले आहे. या सर्व वारकरी बाल पथकांस संप्रदायातील टोपी व रुमालसाठी जगदीश एकनाथ माळी यांनी तर गणवेशासाठी रोशन टाटिया यांनी पांढरे कापड व गणवेश शिलाई साठी रॉकी सोनवणे, संजयकुमार महाजन, दीपक देशमुख, बापू थेटे, प्रवीण दयाराम माळी, जवान भूषण पवार यांनी भरीव मदत केली आहे.

तसेच गावातील सेवानिवृत्त जवान भूषण पवार यांचा सत्कार वारकरी संप्रदायातील बाल पथकामार्फत करण्यात आला. डॉ. विश्वास भामरे, उद्धव शास्त्री, पांडुरंग माळी-भडणेकर, दीपक देशमुख, अर्जुन माळी, रमेश परदेशी, बळीराम माळी, दिलीप परदेशी, दत्तात्रय माळी, किरण माळी, प्रकाश जाधव महाराज, दीपक देशमुख, निंबा माळी, सतीश माळी महाराज, गोकुळ माळी, गोरख माळी, भरत माळी, नीलेश माळी, शेनपडू माळी, राजेंद्र माळी, केशव संतोष माळी, प्रवीण दयाराम माळी, योगेश माळी, इंद्रसिंग गिरासे उपस्थित होते. शुभम माळी, रोशन माळी, मयंक भामरे, केशव माळी, कल्पेश भामरे, सूरज परदेशी, प्रणव माळी, योगेश माळी यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...