आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बकरी केली ठार:आमलाड शिवारात बिबट्याने हल्ला करून बकरी केली ठार

तळोदा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील रहिवासी असलेले निंबा पाटील यांच्या आमलाड शिवारातील शेतात बिबट्याने शेळी फस्त केल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या वावर वाढला असून, पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनेमध्ये झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी राणाजी बजारिया धानका, हे बकरी चारण्यासाठी गेले होते. दुपारी ३ वाजता आमलाड शिवारात निंबा पाटील यांच्या शेतात बकऱ्या चरत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक बकरीवर हला चढवून ओढून नेत असताना राणाजी धानका यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने धूम ठोकली.

बातम्या आणखी आहेत...