आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते. त्यामुळे पुस्तक सर्वात जवळचा मित्र असतो. तो नेहमी उपलब्ध असणारा, चांगला सल्लागार आणि सर्वात संयमी शिक्षक सुद्धा असल्याचे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी कळंबू येथील विद्यालयात केले. तेथील शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. ते स्वतः कळंबू विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. माजी प्राचार्य प्रा.एम.ए. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर केले.
शहादा तालुक्यातील महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कळंबू येथील डी.जी.बी. शेतकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या मदत निधीतून तीन हजार वह्या, एक हजार पेन व तेवढ्याच पेन्सिलसह विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. माजी प्राचार्य एम.ए. चौधरी यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला. विद्यालयातील समान गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मानसी बोरसे व ऋतुजा देवरे ह्या विद्यार्थिनींचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक भरत पंडित, शरद पाटील, उपव्यवस्थापक राजेश बनसोडे उपस्थित होते. साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. गरीब विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मदत निधी गोळा करून वह्या व इतर शैक्षणिक साहित्य वाटप केले. सूत्रसंचालन भूषण गवळे यांनी तर आभार प्राचार्य आर.एम. पटेल यांनी मानले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.