आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामेळावा:शासकीय योजनांचा शहरात रविवारी होणार महामेळावा

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या जिल्हा शाखा आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी (दि.१३) राेजी सकाळी ११ वाजता पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या पटांगणावर विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा व याेजनांचा महामेळावा हाेणार आहे.

अशी माहिती धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी यांनी दिली आहे. या महामेळाव्यात शासनाच्या विविध सेवा व योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने एकाच ठिकाणी विविध शासकीय विभागांच्या योजनांचे ५० पेक्षा अधिक स्टॉल लावण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...