आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:लोंबकळणाऱ्या तारांमुळे शहाद्यात ट्रकमधील बारदानला भीषण आग; सहा लाखांचे गोणपाट जळून खाक

शहादा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील डोंगरगाव रस्त्यावर पटेल रेसिडेन्सी जवळ अहिंसा चौकातून गोणपाट घेऊन जाणाऱ्या ट्रकला वीज मंडळाच्या लोंबकळणाऱ्या वीजतारा लागल्याने ठिणगी पडून आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी दहा साडेदहाला घडली. यात सुमारे ६ लाखांचे गोणपाट जळून नुकसान झाले. नागेश्वर ट्रेडिंग कंपनीचे ओम प्रकाशराज पुरोहित यांचा गोणपाटाचा माल घेऊन ट्रक (एमपी ०९, एलक्यू ०७८६) खेतिया कडे जात होता. शहादा शहर शिवसेनाप्रमुख गुलाबराव सुतार, निजामोद्दीन लोहार, अझरुद्दीन कयामत, मोहम्मद शब्बीर या लोहार बंधूंनी आग विझवली.

मोठी दुर्घटना टळली
अहिंसा चौकात ट्रकमधील गोणपाटला आग लागण्याची सुरुवात लक्षात येताच ट्रकमध्ये चढून गठ्ठे रस्त्यावर फेकण्यात आले. चालकाचे यावेळेस लक्ष नव्हते. नागरिकांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. गुलाबराव सुतार, शिवसेनाप्रमुख, शहादा

बातम्या आणखी आहेत...