आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमदार राजेश पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून बोरद परिसरात असणाऱ्या कढेल फाट्याजवळ प्रथमच प्रवासी निवारा बांधण्यात येत आहे. तळोद्यापासून बोरदकडे येताना अवघ्या १२ किलोमीटरवर अंतरावर असलेले व मुख्य रस्त्यापासून म्हणजेच फाट्यापासून ८०० मीटर आत कढेल गाव आहे. बोरदकडून येताना ६ किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव.
या गावाची लोकसंख्या साधारणपणे १२०० च्या घरात आहे. असे असले तरी या गावात बागायतदार शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या गावाने कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमाने एक पंचायत समिती सदस्यही दिला होता. असे असले तरी या गावात प्रवासी बसचे दर्शन हे दुर्लभच,या गावातील लोकांना कोठेही प्रवास करावयाचा म्हटल्यास त्यांना प्रथम फाट्यावर यावे लागते. म्हणजेच मुख्य रस्त्यापर्यंत यावे लागते. तेथूनच शहादा जाण्यासाठी किंवा तळोदा जाण्यासाठी बस अथवा खासगी वाहन मिळत असतात.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते आजपावेतो या गावात एसटी महामंडळाकडून बस ही पाठवली गेली नाही. गावातील लोकप्रतिनिधी यांच्याकडून बस सुरू होणेकामी पाठपुरावा नेहमी सुरू असतो; परंतु आश्वासना पलीकडे काही मिळत नाही. शेवटी येथील गावकऱ्यांना फाट्यापर्यंत येण्यावाचून पर्याय नसतो. त्यामुळे येथील प्रवासी हा तळोदा, बोरद रस्त्यावर मुख्य ठिकाणी उभा राहून येणाऱ्या वाहनांची वाट पाहत असतो. अशा वेळेस प्रवाश्यास उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात त्रास सहन करावा लागत होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.