आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आविष्कार:बहुद्देशीय शेती यंत्र, मूव्हिंगरोड, गणितीय प्रतिमाने उपकरण प्रथम; तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण

शिंदखेडा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरणाने समारोप झाला. प्रदर्शनात बहुद्देशीय शेती यंत्र, मूव्हिंग रोड, गणितीय प्रतिमाने, आपला हात जगन्नाथ, सायन्स किट या उपकरणांनी प्रथम क्रमांक मिळवला.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुसुम दिगंबर निकम, जनता शिक्षण विद्या प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. भालचंद्र प्रल्हाद पाठक, जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अशोक गुजर, बेटावदच्या सरपंच सुशीलाबाई कोळी, पंचायत समितीचे सदस्य नंदिनी कोळी, शानाभाऊ सोनवणे, शिंदखेडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील आदी उपस्थित होते.

प्रदर्शनाला शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी भेट दिली. प्रदर्शनात सहावी ते आठवीच्या गटात कल्पेश भगवान अहिरराव (बहुद्देशीय शेती यंत्र, गंगाबाई हायस्कूल,वाघाडी), प्रांजल महेंद्र जमदाडे (कोनाचे प्रकार, श्री फ.मु. ललवाणी विद्यालय, बेटावद), सर्वज्ञ अनंत पाटील सौरऊर्जा हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय तर उत्तेजनार्थ बक्षीस नक्षत्रा रवींद्र ठाकूर आरोग्य व स्वच्छता व्ही. के. पाटील स्कूल शिंदखेडा व हर्षल दीपक माळी हवेचा दाब साने गुरुजी विद्यालय अजंदे बु. यांनी मिळवला.

नववी ते बारावीच्या गटात चेतना संजयसिंग राजपूत मूव्हिंग रोड नूतन माध्यमिक विद्यालय दोंडाईचा, रागिणी गोविंद गांगुर्डे असिडिफिकेशन ऑफ ओसीयन हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा, स्मिता माधवराव पाटील पर्यावरण अनुकूल जीवामृत तयार करणे कै. रंगराव पाटील विद्यालय वालखेडा यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय तर उत्तेजनार्थ बक्षीस अनुष्का अनंत झारे चंद्रयान फ. मु. ललवाणी विद्यालय, बेटावद यांनी मिळवला. शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.के. कदम, फ.मु. ललवाणी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य वाय.डी. चाचरे, जिल्हा विज्ञान उपक्रम समितीचे अध्यक्ष संजय गोसावी, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, उपाध्यक्ष अतुल पाटील, कार्याध्यक्ष जे. डी. भदाणे, केंद्रप्रमुख पद्माकर सांगळे, तालुका विज्ञान संघाचे सचिव एस. एन. माळी, एम. डी. पाटील आदी उपस्थित होते. प्रा. ए. एस. माळी, प्रा. एम. एम. चौधरी, प्रा. पी. व्ही. माळी, प्रा. बी. पी. देवरे, प्रा. एच. डी. बच्छाव, वाय. आर. देसले यांनी परीक्षण केले.

शैक्षणिक साहित्य विभागातील विजेते
प्राथमिक गट- प्रथम : महेश अशोक बाविस्कर गणितीय प्रतिमाने गुरुदत्त हायस्कूल वायपूर, द्वितीय : श्रीराम दंगल मगर मल्टिपल प्लेइंग कार्ड हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा. माध्यमिक गट- प्रथम : नारायण पुंडलिक भिलाने आपला हात जगन्नाथ वाल्मीक ऋषी विद्यालय तावखेडा, द्वितीय : पी. आर. पाटील गणितीय व समाजोपयोगी लेसर मिटर अगस्तमुनी विद्यालय कलमाडी. उत्तेजनार्थ : अभिषेक प्रभाकर चंद्रा आवर्त सारणी फ. मु. ललवाणी विद्या बेटावद. प्रयोगशाळा परिचर गट : प्रथम विजय चौधरी सायन्स किट हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा. द्वितीय निखिल देवरे सायन्स किट हस्ती वर्ल्ड स्कूल दोंडाईचा.

बातम्या आणखी आहेत...