आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईनेच दिली खुनाची सुपारी:मुलाच्या कॉल रेकॉर्डवरून सुटला खुनाचा गुंता, धुळ्याच्या मेहेरगाव येथील घटनेला नवे वळण

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलाच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे त्रासलेल्या सख्ख्या आईनेच त्याच्या खुनाची सुपारी दिल्याचे धुळे तालुक्यातील खूनप्रकरणी पोलिसांनी २४ तासात केलेल्या तपासात उघड झाले आहे. मेहेरगाव येथील अमोल भामरे याच्या खूनासाठी आई लताबाई यांनीच संशयित आरोपी पुंडलिक भामरे व अन्य दोघांना २५ हजारात सुपारी दिली होती. पोलिसांनी अमोलच्या मोबाइलवरून केले गेलेले कॉल तपासले, त्यात शेवटचा कॉल पुंडलिकला केलेला असल्याने त्याच्यावर संशय बळावला आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर उलगडा झाला.

अमोलच्या व्यसनाला भामरे कुटुंब कंटाळले होते. त्याच्या बहिणीचा संसारही अमोलमुळे मोडला होता. तसेच बदनामीला सामोरे जावे लागत असल्याने त्याच्या खुनाची सुपारी देण्यात आल्याचे तपासातून उघड झाले आहे. अमोल विश्वास भामरे (३८) याचा गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली होती. पथकाने तपास सुरू केल्यावर अमोलच्या शेजारी राहणाऱ्या पुंडलिक गिरधर भामरे याच्यावर संशय आला. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने अमोलची आई लताबाई विश्वास भामरे यांनी २५ हजारांत अमोलच्या खुनाची सुपारी दिल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...