आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातळोदा तालुक्यातील एकूण २५ तलाठी कार्यालय मंजूर झाले आहेत. या कामासाठी महसूल विभागाकडून ६ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तळोदा, बोरद, प्रतापपूर व सोमावल या ठिकाणी चार मंडळ कार्यालय मंजूर आहेत. यासाठी १ कोटी ६० लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून लवकरच या इमारतीच्या कामांना सुरुवात होणार आहे. तळोदा तालुक्यातील २५ महसूल सजा असलेल्या गावात तलाठी व मंडल अधिकारी यांच्या शासकीय कार्यालयाचे बांधकाम लवकरच केले जाणार आहे. त्यामुळे तलाठी व मंडल अधिकारी यांना हक्काचे कार्यालय मिळणार आहेत. त्यात बोरद गावाचाही समावेश आहे. बोरद येथे १९५२ पूर्वी तलाठी कार्यालय बांधण्यात आलेले होते. या कार्यालयाच्या इमारतीला कौलारू छत असून पावसाळ्यात मंडल अधिकारी तथा तलाठी यांना बसण्याची ही जागा शिल्लक राहत नव्हती. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही इमारत गळत होती. त्यामुळे ही पूर्णतः जीर्ण अशी पडकी इमारत झालेली असून साधारणतः ७५ वर्षांपूर्वी हे तलाठी कार्यालय व मंडल अधिकारी कार्यालय बांधण्यात आलेले होते.तालुक्यातील सर्वात मोठे असे १९ ते १३ हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे. या बोरद सजाला १५ ते २० असे महसूल गावे जोडलेली आहेत.
त्यामुळे एवढ्या गावातील लोकांचा या ठिकाणी कागदपत्रांसाठी वावर असतो. परंतु पडकी इमारत असल्याने जनतेला उन्हातान्हात उभे राहावे लागते. तसेच इमारत पडकी असल्याने कोणीही त्या इमारती जवळ थांबत नव्हते. मात्र तलाठ्यांना व मंडल अधिकाऱ्याला या ठिकाणी आपला जीव मुठीत धरून थांबून काम करावे लागत होते. गाव पातळीवर बसण्यासाठी हक्काची कार्यालय मिळून येत नव्हती त्यामुळे नवीन कार्यालय बांधकामासाठी प्रांत अधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवण्यास सांगितले होते त्या दृष्टीने प्रस्ताव पाठविण्यात आले होते.
बोरद येथील पडक्या अवस्थेतील तलाठी कार्यालय. या गावातही नवीन तलाठी कार्याल बोरदसह छोटा धनपूर, मोहिदा राणीपूर, भवर, कोठार, दलेलपूर, चिनोदा, राजवीर, खुशगव्हाण, शिर्वे, मोड, कढेल, तळवे, मोरवड, अमोनी, इच्छाव्हान, धानोरा, खरवड, मालदा, करडे,पाडळपुर, नळगव्हाण, मोदलपाडा, अंमलपाडा या गावांच्या तलाठी कार्यालयाची इमारत उभी राहणार आहे.
या गावातही नवीन तलाठी कार्याल बोरदसह छोटा धनपूर, मोहिदा राणीपूर, भवर, कोठार, दलेलपूर, चिनोदा, राजवीर, खुशगव्हाण, शिर्वे, मोड, कढेल, तळवे, मोरवड, अमोनी, इच्छाव्हान, धानोरा, खरवड, मालदा, करडे,पाडळपुर, नळगव्हाण, मोदलपाडा, अंमलपाडा या गावांच्या तलाठी कार्यालयाची इमारत उभी राहणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.