आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:खाऊच्या पैशातून दिला एक वही, एक पेन

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाजाच काहीतरी देण लागतो या जाणीवेतून पोदार इंटरनॅशनल स्कूलतर्फे गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मदत करणयासाठी एक वही एक पेन हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून अडीच हजार पेन व ६२० वह्या शहरातील घरेलू कामगार महिलांच्या प्रश्नांवरती काम करणाऱ्या नवनिर्मिती संस्थेच्या मदतीने गरजू विद्यार्थ्यांना दिल्या.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य भूषण उपासनी, राजू पाटील, शशिकांत भदाणे, नवनिर्मिती संस्थेचे अध्यक्ष शहाजी शिंदे, युवती प्रकल्प समन्वयक शुभांगी गांगुर्डे आदी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम झाला.

बातम्या आणखी आहेत...