आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिसांच्या पाठीवर सत्कारातून कौतुकाची थाप

धुळे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. या वेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

लघु उद्योजकांच्या कार्याला सत्कारातून दिली बळकटी
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. लघुउद्योजक जिल्हा पुरस्कार विजेते राजेश गिंदोडिया व सिद्धार्थ गिंदोडिया (मे. राजसिद्धी इंडस्ट्रीज), वैशाली अविनाश पाटील, दिनेश कुवर, मे. पार्थ वायर प्रॉडक्ट, पराग श्रॉफ (२०१९), आदर्श तलाठी मनीषा सखाराम ठाकरे (सजा वणी) म्हणून यांचा सत्कार करण्यात आला. पोलिस महासंचालक पदक मिळवणारे राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सहामधील संदीप बाळकृष्ण सोनवणे, नीलेश जगन्नाथ झाल्टे, घनश्याम सुधाकर व्यवहारे, नीलेश शिवाजी देवरे, प्रवीण दामोदर अमृतकर, सिद्धप्पा हरिभाऊ गवळी, मुकेश मधुकर अहिरे, संदीप साहेबराव पाटील, जितेंद्र गोकुळसिंग परदेशी यांचा सत्कार करण्यात आला.

सामाजिक न्याय विभागाने केली योजनांवर जनजागृती
महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस कवायत मैदानावर सामाजिक न्याय विभागातर्फे विविध योजनांची माहिती देण्यासाठी जनजागृती करण्यात आली. त्यासाठी स्वतंत्र स्टॉल मांडण्यात आला होता. या स्टॉलला पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह उपस्थितांनी भेट देत योजनांची माहिती घेतली. सामाजिक न्याय विभागातर्फे विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत विविध योजना राबवण्यात येतात. त्यात पोस्ट व प्री मॅट्रिक स्कॉलरशीप, राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, रमाई आवास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, बार्टीच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण, उपक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण आदी योजना राबवण्यात येतात. या योजनांसह महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या योजनांविषयी जागृती करण्यात आली. नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, त्यासाठी सामाजिक न्याय विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन झाले.

बातम्या आणखी आहेत...