आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी दिली जावी

दोंडाईचा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी जिल्ह्यातील सेलू येथे दहावर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी दोंडाईचा शहर नाभिक समाजाच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. त्यासाठी नायब तहसीलदार राजेंद्र मोरे यांना निवेदन दिले.

सेलू शहरातील १० वर्षीय मुलगी व तिचा मावसभाऊ हे सेलू-देवगाव रस्त्यावर उभे असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचे अपहरण करून मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर संशयित आरोपींना पकडण्यात आले आहे. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नाभिक दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सैंदाणे, रवींद्र चित्ते, छोटू महाले, समाधान ठाकरे, किरण सूर्यवंशी, भावराव सैंदाणे, अनिल ईशी, महेंद्र चित्ते, गणेश पवार, कैलास चित्ते, देविदास चित्ते, गोपाल बोरसे, हिंमत पवार, मुकेश चित्ते आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...