आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:गरोदर मुलीने दिला मृत मुलाला जन्म‎ ; तक्रारीवरून संशयितावर गुन्हा दाखल

धुळे‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून जवळ असलेल्या हरणमाळ‎ येथील १६ वर्षीय मुलीवर अत्याचार झाला.‎ त्यातून गरोदर राहिलेल्या मुलीने एका मृत‎ बाळाला जन्म दिला. या प्रकरणी पीडितेच्या‎ तक्रारीवरून संशयितावर गुन्हा दाखल‎ झाला.‎ याविषयी १६ वर्षीय मुलीने तक्रार दिली‎ आहे. त्यानुसार संदीप छोटू सोनवणे (वय‎ २१, रा. रावेर, ता. धुळे) याने मुलीला लग्न‎ ठरले असल्याचे सांगून तिच्यावर अत्याचार‎ केला. पीडिता व संदीपच्या घरात हा प्रकार‎ झाला. सप्टेंबर २०२२ पासून हा प्रकार सुरू‎ होता.

त्यातून मुलगी गरोदर झाली. तिने‎ वेळच्या आधी मुलाला जन्म दिला. या‎ मुलाचा जन्मानंतर काही तासांत मृत्यू‎ झाला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून‎ धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ झाला. उपनिरीक्षक राजश्री पाटील तपास‎ करत आहे. दरम्यान, संदीपला अटक‎ झाली असून, न्यायालयाने त्याला‎ बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची‎ माहिती पोलिसांनी दिली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...