आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक‎:माता रमाई जयंतीनिमित्त‎ आज शहरातून मिरवणूक‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त उद्या‎ मंगळवारी (दि.७) दुपारी ४ वाजता‎ देवपुरातील सावित्रीबाई फुले यांच्या‎ पुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात‎ येणार आहे. मिरवणुकीचे आयाेजन‎ राजमाता रमाई महिला मंचतर्फे‎ करण्यात आले आहे.

मिरवणुकीत‎ दाेन ते अडीच हजार महिला‎ सहभागी हाेतील. तसेच‎ अश्वरथावर माता रमाई यांची‎ प्रतिमा असेल. मिरवणुकीचा‎ समाराेप जेलराेडवरील डाॅ.‎ बाबासाहेब आंबेडकर यांच्या‎ पुतळ्याजवळ केक कापून व‎ सामूहिक बुद्ध वंदनेने हाेणार आहे.‎ महिलांनी पांढरी साडी, निळे ब्लेझर‎ परिधन करून व निळे फेटे बांधून‎ सहभागी व्हावे. पुरुषही मिरवणुकीत‎ सहभागी हाेऊ शकतात.‎

बातम्या आणखी आहेत...