आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शहरातून शनिवारी श्री सद्गुरू गजानन महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात गण गण गणात बोतेचा गजर करण्यात आला. तसेच पालखी मार्गावर महिलांकडून रांगाेळी व आैक्षण करीत पालखी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. पालखी मिरवणुकीत भजनी मंडळासह विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने नृत्य सादर केली. याप्रसंगी अनेकांनी पालखीच्या दर्शनाचा लाभ घेतला. गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात शनिवारी पालखी मिरवणुकीपासून करण्यात आली. दरवर्षी मिरवणुकीचे आकर्षण असते. देवपुरातील श्री सद्गुरू गजानन महाराज सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळातर्फे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात येते. त्यानुसार यंदाही प्रकट दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त खाेलगल्लीतील बालाजी मंदिरापासून पालखी मिरवणुकीचे आयाेजन केले गेले. पालखीच्या मिरवणुकीपूर्वी बालाजी मंदिरात संत गजानन महाराजांची आरती पवन पाेद्दार, त्यांच्या पत्नी संगीता पाेद्दार यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष गाेपाळराव केले, त्यांच्या पत्नी सुनंदा केले यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कमलाकर जोशी, रोहिणी जोशी, तुळशीराम बोरसे, दिलीप भट व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. बालाजी मंदिरापासून पारंपरिक वाद्यांच्या गजरात गजानन महाराजाचा जयघाेष करीत पालखी मिरवणूक काढण्यात आली. गल्ली क्रमांक चार, नगरपट्टी, गल्ली क्रमांक सहा, जिंगर गल्ली, टाॅवर बगिचा राेड, पाेलिस चाैकी, आग्राराेड, देवपूर पंचवटी, नेहरू चाैकाकडून वाडीभाेकर राेडवरून नेहरू नगर, पंचायत समिती, जयहिंद काॅलेज, जिल्हा क्रीडांगणाकडून पालखी मिरवणूक रामनगरातील गजानन महाराज मंदिरात पाेहाेचली. त्यानंतर पालखीची सांगता करण्यात आली. तर रात्री ८ वाजता मंदिरात वारकऱ्यांतर्फे रिंगण साेहळा हाेणार आहे. कथा व प्रगट दिनाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गाेपाळ केले व विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.
उद्यापासून शिवमहापुराण कथा
दरम्यान,गजानन महाराज मंदिरात ६ ते १० फेब्रुवारी या काळात शिवपुराण कथेचा कार्यक्रम हाेणार आहे.कथाकार हभप.धनंजय देशपांडे असणार आहे.तर श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण ८ ते १० फेब्रुवारी या काळात सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत हाेईल.तर १३ फेब्रुवारी राेजी श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सकाळी पाच वाजेपासून मंदिरात महाअभिषेक,दुपारी महाआरती, महाप्रसादाचा कार्यक्रम हाेणार आहे.
वारकरी पथक, कलशधारी महिला
पालखी मिरवणुकीत सजवलेल्या रथावर गजानन महाराज यांची प्रतिमा ठेवण्यात आली हाेती.तसेच घाेडेस्वार,लेझीम पथक,शेगावकडील वारकरी पथक,कलशधारी महिला,शहरातील भजनी मंडळ,भालदार, चाेपदार आदींचा सहभाग हाेता. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.