आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:विकास कामांचा प्रस्ताव सादर करावा

साक्रीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री येथील नगरसेवकांनी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी साक्री नगरपंचायतीच्या विकास कामासंदर्भात चर्चा करण्यात आली. प्रथमच भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर साक्री शहराच्या विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी शहरातील विकास कामांसंदर्भातील प्रस्ताव त्वरित सादर करण्याची सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

आमदार अमरीश पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे भेट झाली. साक्री शहराला भेडसावणाऱ्या पाणीप्रश्न संदर्भात अमरीश पटेल यांनी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अक्कलपाडा धरणातून पाणीपुरवठा योजना मंजूर केल्यास शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सुटू शकतो, असे सांगितले. यावर यासाठी त्वरित दखल घेऊन योजना मंजुरीचे आश्वासन मंत्री फडणवीस यांनी दिले.

शहरांमधील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. या भेटीप्रसंगी शेतकी संघाचे चेअरमन विलासराव बिरारीस, नगराध्यक्ष प्रतिनिधी हेमंत पवार, उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, बांधकाम सभापती अॅड. गजेंद्र भोसले, पाणीपुरवठा सभापतींचे प्रतिनिधी आबा सोनवणे, पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे, जि.प. सदस्य विजय ठाकरे व सामोडेचे सरपंच दीपक भारुडे, स्वच्छता व आरोग्य समितीचे प्रतिनिधी महेंद्र देसले, नगरसेवक प्रवीण निकुंभ, दीपक वाघ, विजय भोसले, जगदीश शिंदे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...