आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील अप्पर तहसील कार्यालय सद्य:स्थितीत जुन्या समाजकल्याण कार्यालयात सुरू आहे. ही जागा लहान असल्याने काम करताना अडचणी येतात. याविषयी ‘दिव्य मराठी’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अप्पर तहसील कार्यालय स्वतंत्र जागेत सुरू करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दिला आहे.
शहरातील अप्पर तहसील कार्यालयात मनुष्यबळाची कमतरता असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. नागरिकांच्या कामांना विलंब होतो. याविषयी ‘दिव्य मराठी’ने १० नोव्हेंबरच्या अंकात सविस्तर वृत्त दिले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अप्पर तहसील कार्यालयाकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागवला हाेता. त्यानुसार अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांनी दाेन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना अहवाल दिला आहे.
त्यात लिपिकांची नऊ पदे मंजूर असताना केवळ पाच लिपिक कार्यरत आहेत. अप्पर तहसील कार्यालयाकडे शहरासह परिसरातील १७ गावांची जबाबदारी असल्याने कार्यालयात दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. पुरेसे कर्मचारी नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना एकाच वेळी दाेन-दाेन जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात.
पंचनामा, जबाबसाठी जावे लागते दुचाकीवर...
अप्पर तहसील कार्यालयाला स्वतंत्र वाहन नाही. अप्पर तहसीलदारांकडे न्याय दंडाधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याने त्यांना विविध कामांसाठी बाहेर जावे लागते. त्याचबरोबर स्थळ निरीक्षण, कायदा व सुव्यवस्था, निवडणूक आचारसंहिता, अवैध गाैणखजिन उत्खनन आदी कामांसाठी दुचाकी अथवा कर्मचाऱ्यांच्या वाहनाचा वापर करावा लागताे. त्यामुळे कार्यालयाला वाहनाची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.