आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील मालमत्ताधारकांचा कर नियमबाह्य व बेकायदेशीर पद्धतीने वाढवला आहे. त्यामुळे या निर्णया विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय मनपा हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांनी स्थापन केलेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शहरातील वलवाडी भागातील शिवसागर मंगल कार्यालयात ही बैठक झाली. या वेळी वाढीव मालमत्ता करावर चर्चा झाली. मनपाने नियमबाह्य व बेकायदेशीर करवाढ केली असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. करवाढ रद्द करावी, या मागणीसाठी महापालिकेला निवेदन देण्यात आले होते.
पण काहीही उपयोग झाला नाही. करवाढ नियमानुसार असून, कर भरावा अशी भूमिका मनपा प्रशासनाने घेतली आहे. पण हद्दवाढीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत १ रुपयाही कर भरू नये असे आवाहन बैठकीत करण्यात आले. तसेच मनपाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा ठराव करण्यात आला. मनपाने केलेल्या बेेकायदेशीर करवाढी विरोधात लढा देण्यासाठी संघर्ष समितीची स्थापन करण्यात आली.
समितीत बी. बी. मासुळे, नाना रायते, एम. वाय. पाटील, अशोक गिरी, आबासाहेब पाटील, अॅड. राजन वाघ, सुभाष मासुळे, उमेश गांगुर्डे, पी. सी. पाटील, नाना साळुंखे, विजय गुरव, आनंदा पाटील, नाना पाटील यांचा समावेश करण्यात आला. बैठकीला आबा पाटील, रणजित भोसले, अरुण धुमाळ, मुकेश खरात, राजेंद्र चौधरी, आबा मराठे, दीपक देसले, जगदीश चव्हाण, स्वप्नील भामरे, प्रवीण साळवे, सुमीत काळे, जितेंद्र पाटील, मयूर देवरे, वाल्मीक वाघ, बापूजी वाघ, शशिकांत पाटील, एस. आर. महाजन, बी. डी. पाटील, उत्तम पाटील, विक्की देवरे, महेंद्र पाटील, कल्पेश चव्हाण आदी उपस्थित होते. महापालिकेच्या हद्दीत असलेल्या गावातील नागरिकांना महापालिकेने आधी मूलभूत सुविधा पुराव्यात, अशी मागणी करण्यात आली. या वेळी हद्दवाढीच्या भागातील समस्यांवर चर्चा झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.