आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:शिक्षकाकडे मागितली‎ सात लाख रुपये खंडणी‎

धुळे‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराजवळील वडेल शिवारातील‎ नाल्याजवळ शिक्षकाला अडवून‎ त्याचे फोटो व्हायरल करण्याची‎ धमकी देत सात लाखांची खंडणी‎ मागण्यात आली.‎ धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील‎ शिक्षक प्रफुल्ल आधार शिंदे (वय.‎ ५४) यांनी याबाबत तक्रार दिली‎ आहे. त्यानुसार ते नगाव-कुसुंबा‎ रस्त्यावरून जात होते. त्या वेळी‎ वडेल शिवारात नैसर्गिक विधीसाठी‎ ते थांबले हाेते.

त्या वेळी किरण‎ उत्तम शिंदे व अन्य दोन जणांनी‎ त्यांना अडवले. तसेच महिलेसोबत‎ व्हिडिओ काढून ते नातलगांमध्ये‎ व्हायरल करण्याची धमकी देत ७‎ लाखांची खंडणी मागितली. दुपारी‎ एक ते दीड वाजेच्या सुमारास हा‎ प्रकार घडला. पश्चिम देवपूर‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.‎

बातम्या आणखी आहेत...