आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यंकट रमणा गोविंदा:142 वर्षात प्रथमच विक्रमी 31 तास रथयात्रा; पावसातही उत्साह, चरण स्पर्शाची साधली संधी

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील भगवान बालाजी यांच्या रथ यात्रेला १४२ वर्षांची परंपरा आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर रथोत्सव साध्या पध्दतीने झाला होता. त्यामुळे यंदा भाविकांमध्ये रथयात्रेविषयी उत्साह होता. रथ यात्रेला गुरुवारी सकाळी अकरा वाजता प्रारंभ झाला. नगर परिक्रमा करून रथ शुक्रवारी सायंकाळी पावणेसहा वाजता बालाजी मंदिरात आला. तब्बल ३१ तास रथयात्रा सुरू होती. इतिहासात प्रथमच विक्रमी वेळ रथयात्रा निघाली.

शहरातील गल्ली क्रमांक चारमधील भगवान बालाजी मंदिरापासून रथ यात्रेला गुरुवारी सकाळी अकरा वाजता प्रारंभ झाला होता. ठिकठिकाणी आरती, महाप्रसाद वाटप झाले. शहरासह जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी आल्याने रात्रभर शहरातील रस्त्यांवर वर्दळ होती. दरवर्षी २२ ते २४ तासात रथ पुन्हा मंदिरात येतो. पण यंदा रथ मंदिरात येण्यासाठी ३१ तास लागले. रथ शुक्रवारी सायंकाळी पावणेसहा वाजता मंदिरात आल्यावर विधिवत पूजा झाली.

त्यानंतर भगवान बालाजींच्या मूर्ती मंदिरात नेण्यात आल्या. रथयात्रा सुरू असतांना शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. पावसात भाविकांचा उत्साह कमी झाला नव्हता. रथ ओढण्यास अनेकांनी प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले.

वर्षभरात होतो एकदाच स्पर्श
भगवान बालाजींच्या मूर्ती रथातून मंदिरात स्थापन झाल्यावर भाविकांना वर्षातून एकदा भगवान बालाजी यांचे चरण स्पर्श करण्याची संधी मिळते. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...