आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नाव नाेंदणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार धुळे शहर विधानसभा मतदार संघातून जवळपास ७ हजार पदवीधरांनी नावनाेंदणी केली आहे. पदवीधर मतदारसंघासाठी ऑक्टाेबर महिन्यापासून मतदार यादीत नावनोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांची नावे पूर्वी यादीत होती त्यांनाही नोंदणी करावी लागणार आहे. नावनोंदणीला ऑक्टोबरमध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नावनोंदणीची मुदत वाढवण्यात आली. आतापर्यंत ७ हजार मतदारांनी नावनोंदणी केली आहे. आतापर्यंत ३ हजार २४० अर्ज मंजूर करण्यात आले आहे. तसेच २ हजार २६४ अर्ज ऑफलाइन पद्धतीने आले आहे. त्यापैकी १ हजार ६५० हजारांची तपासणी पूर्ण झाली आहे. ऑनलाइन पद्धतीने १ हजार १०० अर्ज दाखल झाले आहे. अर्जांची तपासणी अपर तहसीलदार संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी करत आहे.
शेवटचे दाेन दिवस शिल्लक पदवी प्राप्त होऊन ज्यांना तीन वर्षे झाले आहे त्यांना नावनाेंदणी करता येत आहे. नावनोंदणीची मुदत ८ डिसेंबरपर्यंत आहे. मतदारांनी नावनाेंदणी करावी. -संजय शिंदे, अपर तहसीलदार, धुळे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.