आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:आर्वी गावात जांभूळ तोडल्याच्या कारणावरून कोयत्याने केला वार; धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

धुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आर्वी या गावात लहान मुलांनी झाडावरील जांभूळ तोडली. यातून संतप्त झालेल्या पप्पू महादू घोरपडे या तरुणाने वाद घातला. यानंतर हिरामण साहेबराव चव्हाण ( वय ३५ ) यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. यातून हिरामण चव्हाण यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. घटनेबद्दल धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.