आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • A Separate Laboratory Of The Municipality Will Be Operational By The End Of November For Blood Testing; Tests Will Be Done At A Moderate Price, Patients Will Get Relief| Marathi News

दिव्य मराठी ब्रेकिग:रक्त तपासणीसाठी नोव्हेंबर अखेरीस मनपाची स्वतंत्र लॅब होणार कार्यरत; माफक दरात होतील तपासण्या, रुग्णांना मिळेल दिलासा

नीलेश बत्तासे | धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या रुग्णालयात फक्त बाह्यरुग्ण तपासणी होते. रक्त, लघवी तपासणीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेतर्फे आता खासगी लॅबच्या मदतीने स्वतंत्र लॅब सुरू केली जाईल. या लॅबमध्ये माफक दरात रक्ताची तपासणी होईल. नोव्हेंबरच्या अखेरीस ही लॅब सुरू होईल.

महापालिकेचे शहरातील विविध भागात बारा दवाखाने आहेत. या ठिकाणी नाममात्र दरात तपासणी होते. तसेच मोफत औषध देण्यात येतात. काही वेळा महापालिकेच्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना आजाराच्या निदानासाठी रक्त, लघवीची तपासणी करावी लागते. पण मनपात या चाचण्या करण्याची सोय नसल्याने रुग्णांना खासगी लॅबमध्ये रक्त, लघवी तपासणीसाठी जावे लागते.

खासगी लॅबमध्ये तपासण्या करणे गरिबांना परवडत नाही. त्यामुळे महापालिकेने स्वत:ची लॅब सुरू करावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार आता महापालिका खासगी लॅबच्या साह्याने स्वत:ची लॅब सुरू करणार आहे. या लॅबमध्ये तपासण्या शासकीय दराने केल्या जातील. त्यामुळे नागरिकांची सोय होईल. ही लॅब पारोळा रोडवरील महापालिकेच्या व्यापारी संकुलाच्या वरील मजल्यावर सुरू होईल. त्यासाठी जागेची पाहणी झाली आहे. तसेच तयारी सुरू झाली आहे.

असे असेल तपासणी शुल्क
महापालिका खासगी लॅबला जागा व काही सुविधा पुरवणार आहे. त्या बदल्यात खासगी लॅब अल्प दरात रक्ताच्या विविध तपासण्या करून देणार आहे. या लॅबमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून शासकीय दरापेक्षा ५ टक्के वाढीव शुल्क घेण्यात येईल. या लॅबमध्ये महापालिकेच्या दवाखान्यातून येणाऱ्या रुग्णाशिवाय अन्य खासगी रुग्णालयातील रुग्णही तपासणी करू शकतात.

३० प्रकारच्या चाचण्या होणाऱ्या
या लॅबमध्ये २० ते ३० चाचण्या येथे होणार आहे. त्यात डब्ल्यूबीसी, ब्लड शुगर, एलएफटी, केएफटी, सीरम इलेक्ट्रोलाइट, कोलेस्ट्राल, थायरॉइड, कॅॅल्शियम, ब्लड ग्रुप, व्हिडॉल, एसजीपीटी, सीपीके, लिपीड प्रोफाइल, ईएसआर, युरिक अॅसिड आदी तपासण्या होतील. तसेच महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या आवारात सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रेची सुविधाही आगामी काळात उपलब्ध होईल.

मनपा देणार या सुविधा : खासगी लॅबला महिन्याला जे उत्पन्न मिळेल त्यातून ८ टक्के रॉयल्टी ही लॅब महापालिकेला देणार आहे. महापालिकेकडून जागेची भाडे आकारणी करण्यात येणार आहे. पण महापालिकेतर्फे वीज व पाणी मोफत देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...