आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:२१ वर्षांनी देशसेवा करून परतलेल्या जवानाचे कुंडाणे गावात केले स्वागत

कापडणे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कुंडाणे येथील सैन्य दलातील जवान २१ वर्षे प्रामाणिक देशसेवा करून घरी परतले. त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सेवापूर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी धुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती धरती देवरे यांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला.

कुंडाणे येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलात सेवारत असणारे विनोद मदन वाघ हे देशातील विविध ठिकाणी खडतर भागात नोकरी करून सुखरूप घरी परतले. त्यांनी भारतीय स्थल सेनेत हवालदार पदावर नोकरी करीत २१ वर्षांच्या कार्यकाळात अनेक संकटांचा सामना केला. परिवारापासून लांब राहूनदेखील प्रामाणिक व एकनिष्ठ देशसेवा केली म्हणून त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवृत्त जवान विनोद वाघ यांची परिवारासह गावातून मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी गावातील महिलांनी त्यांचे औक्षण केले. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण सभापती यांनी भेट देत २१ वर्षे देशसेवा करणाऱ्या वाघ यांचे कौतुक करत सपत्नीक सन्मान केला. रामभाऊ वाघ, श्यामराव वाघ, बाबूलाल वाघ, रतिलाल वाघ, कृष्णा वाघ, भास्कर वाघ, सुरेश वाघ, जी. जी. पाटील, यशवंत पाटील, हरीश शेलार, भाईदास भदाणे, किशोर पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...