आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादि नवापूर एज्युकेशन सोसायटीद्वारे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘एक सलाम देश के नाम’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आले.
शुक्रवारी येथील सार्वजनिक गुजराती हायस्कूलच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी गीताबेन राजपूत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. मान्यवरांचे स्वागत प्राचार्य संजयकुमार जाधव, नवापूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शीतल वाणी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सतीश शाह, शोएब मांदा, फकीर अग्रवाल, रजनीकांत मिस्त्री आणि जयेश अग्रवाल उपस्थित हाेते. वक्तृत्व स्पर्धेत विविध शाळांमधील इयत्ता पाचवी ते १२वी वर्गातील विद्यार्थ्यांनी तीन गटांत सहभाग नोंदवला. कार्यक्रमात सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या वक्तृत्व केले. गोपाळराव पवार, अनिल वेंडाईत व डॉ.अपूर्व हेमंत शाह यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक तहसीलदार मंदार कुळकर्णी यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. अध्यक्षीय भाषणात शाह यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाचे कौतुक केले. विविध स्पर्धांचे महत्त्व सांगून प्रोत्साहित व मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे पदाधिकारी उपस्थित होते. यास्मिन शेख यांनी आभार मानले. सूत्रसंचालन भरत सैंदाणे, अमोल दिवटे, जे.व्ही. जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शालेय वक्तृत्व समितीने प्रयत्न केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.