आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:गोवर लस घेतलेल्यांचे सर्वेक्षण

धुळे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गोवरचे सात रुग्ण आढळले असून काही संशयित रुग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी डब्ल्यूएचओचे देखरेख वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश नांदापूरकर यांच्या उपस्थितीत मनपात बैठक झाली. बैठकीत ५ वर्षांखालील किती बालकांचे गोवर लसीकरण झाले आहेे याचे सर्वेक्षण करण्याची सूचना त्यांनी केली. त्यानुसार शहरात तातडीने सर्वेक्षण केले जाईल.

बैठकीला मनपाचे आरोग्याधिकारी डाॅ. एम. आर. शेख, डॉ. संपदा कुलकर्णी उपस्थित होते. शहरात गोवरच्या किती रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे याची माहिती मागवावी. तसेच गोवरची लस घेतलेल्या ५ वर्षांखालील बालकांचे आशा वर्करच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे, पाच वर्षांखालील किती बालक आहे याची माहिती घ्यावी, प्रामुख्याने दाट लोकवस्तीच्या भागावर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना बैठकीत झाली. संशयित बालक आढळल्यास त्याचे रक्तनमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणी पाठवण्याची सूचना झाली.

बातम्या आणखी आहेत...