आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात चोरीचे प्रकार वाढले असून, रविवारी मध्यरात्री मोटारसायकल चोरीसह घरात चोरट्यांनी प्रवेश करत हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. खांडबारा क्षेत्रात वाढत्या चोऱ्या खांडबारा पोलिसांना आव्हान देत आहे. खांडबारा परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका व्यक्तीची मोटारसायकल लंपास तर एका घरातून चार हजार दोनशे रुपयांचा डल्ला मारल्याची घटना मध्यरात्री घडली आहे.
खांडबारा येथील बटेसिंगनगर येथे कैलास शिवदास वसावे यांची दुचाकी (एमएच ३९, एच ०४६७) लंपास करण्यात आली असून, अज्जू शेख यांच्या घरामध्ये एका पिशवीत लाइट बिल भरण्यासाठी ठेवलेले ४२०० देखील लंपास केल्याची घटना घडली आहे. अज्जू शेख यांच्या घराची खिडकी उघडून घरात प्रवेश केला. घरामध्ये फ्रिजमध्ये ठेवलेले जेवणदेखील चोरट्यांनी फस्त केले आहे. घरामध्ये सर्व सामान अस्ताव्यस्त केला. तसेच नरेंद्र तडवी यांची दुचाकीदेखील चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे.
सदर मोटारसायकल गाभाऱ्यात अडकल्याने चोरट्यांनी ती मोटारसायकल तिथेच सोडून पोबारा झाले आहेत. तसेच सादिक शेख यांची मोटारसायकलही चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला; परंतु पेट्रोल संपल्याने काही अंतरावर मोटारसायकल सोडून चोरटे पसार झाले आहेत. दोन ठिकाणावर चोरी झाल्याने व दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याने झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.