आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:बिजासन घाटात टँकर मोटारसायकलवर उलटले, पती-पत्नीसह दोन मुलींचा मृत्यू

शिरपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन मुली वाचल्या, तीन महिन्यांच्या मुलीला खरचटलेही नाही

मुंबई-आग्रा महामार्गावरील बिजासन घाटात रविवारी सकाळी तेलाचे टँकर दुचाकीवर उलटले. या अपघातात दुचाकीवरील पती, पत्नीसह दोन मुली टँकरखाली दबून ठार झाल्या. तसेच दोन लहान मुली जखमी झाल्या आहेत. दुचाकीस्वार महाराष्ट्रातील पनाखेड येथे सासरी गेला होता. तेथून तो पुन्हा मध्य प्रदेशातील साकड येथे जात होता. त्या वेळी हा अपघात झाला.

कमल भीमसिंग पटेल (३८), त्याची पत्नी नुरमाबाई (३५), मुलगी गरी (२), गुंदिया (१, सर्व रा. साकड, मध्य प्रदेश) यांचा मृत्यू झाला. चार वर्षांची गुंजा ही जखमी झाली, तर तीन महिन्यांच्या अनाजला साधे खरचटलेदेखील नाही. ती आईच्या कवेत होती. मुंबई-आग्रा महामार्गावरील बिजासन घाटातून मंदसौर येथून कर्नाटककडे तेलाचे टँकर जात होते. हे टँकर दुचाकीवर उलटले. त्यामुळे दुचाकीस्वार, त्याची पत्नी व चार मुली टँकरखाली दाबल्या. अपघातात पती-पत्नी, दोन मुली जागीच ठार झाल्या. एक मुलगी जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल केले. टँकरचालकाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यालाही रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त दुचाकी विनानंबरची होती. त्यामुळे अपघातग्रस्तांची ओळख पटवणे कठीण झाले होते. दुचाकीच्या किल्लीवर बडवानी येथील शोरूमचा नंबर होता. त्यानंतर दुचाकीच्या चेसिस नंबरवरून दुचाकीस्वाराचा नाव, पत्ता शोधण्यात आला. त्यावरून साकड येथील राजेश पटेल यांची ही दुचाकी असल्याचे स्पष्ट झाले. ही दुचाकी त्यांचा भाऊ कमल घेऊन गेला होता. तो पनाखेड येथून परत येत असताना हा अपघात झाला.

मप्र सरकारकडून १३ लाखांची आर्थिक मदत

मृत पटेल यांना साकड (मध्य प्रदेश) येथील सरपंच रविदास सोलंकी यांनी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली, तर मृत परिवाराला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी १४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. त्यात एक लाखाची तत्काळ मदत दिली.

बातम्या आणखी आहेत...