आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हजार विद्यार्थी स्थापन करणार मातीची गणेशमूर्ती ; स्वत:च तयार केलेल्या मूर्तीची करणार पूजा, जलप्रदूषण टळण्यास होणार मदत

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा या उद्देशाने शहरातील विविध शाळांमध्ये शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा झाल्या. या कार्यशाळेच्या माध्यमातून शहरातील एक हजारावर विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून स्वत: तयार गणेशमूर्ती केल्या. याच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला आहे.

शहरातील शाळांमध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्यावर कार्यशाळा झाल्या. त्यानुसार यंदाही शहरातील मयूर शैक्षणिक संस्थेचे झेड. बी. पाटील विद्यालय, मोहाडी उपनगरातील पिंपळादेवी विद्यालय, वार येथील केंद्रीय आश्रमशाळा, जयहिंद माध्यमिक विद्यालय, महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय, महाजन हायस्कूल, विसपुते प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय, विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये मूर्ती तयार करण्यावर कार्यशाळा झाल्या. अजमेरा आयुर्वेद महाविद्यालयात भावी डॉक्टरांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी स्वत:च तयार केलेल्या गणेशमूर्तीची गणेशोत्सवात स्थापना करण्याचा संकल्प केला आहे.

बारा वर्षांपासून मोफत घेताय कार्यशाळा
शहरातील डॉ. रूपाली चित्ते गेल्या दहा ते बारा वर्षांपासून शाडू मातीपासून गणपती तयार करण्यावर मोफत कार्यशाळा घेतात. यावर्षीही त्यांनी विविध शाळांमध्ये कार्यशाळा घेतल्या. त्यांना सामाजिक संघटनांचे सहकार्य लाभले. त्यांनी यंदा जयहिंद विद्यालय, अजमेरा आयुर्वेद महाविद्यालयासह कार्यशाळा घेतल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी घेतली शपथ : शहरातील महाराणा माध्यमिक विद्यालय गेल्या पाच वर्षांपासून कार्यशाळा घेत आहे. फक्त मूर्ती तयार करण्याचे धडे देऊन संयोजक थांबत नाही तर विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शपथ देण्यात येते. पर्यावरण संवर्धनासाठी यावर्षी शाळेत कार्यशाळा झाली.

बातम्या आणखी आहेत...