आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा बैठक:सीईओंचा साडेतीन तास आढावा; प्रमुख अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली माहिती, उद्या आयुक्तांसोबत बैठक

धुळे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी शनिवारी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ही बैठक तब्बल साडेचार तास सुरू होती. सीईओ भुवनेश्वरी एस यांनी जिल्हा परिषदेला मिळालेला निधी, सुरू असलेली कामे, तसेच विविध योजनांचा आढावा घेतला.

बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, जिल्हा आराेग्याधिकारी डाॅ. संतोष नवले, शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, मोहन देसले, जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एम. सोनवणे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय देवरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पढ्यार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजेंद्र लंघे, महिला व बालकल्याण अधिकारी हेमंत भदाणे आदी उपस्थित होते.

बैठकीत विभागांच्या योजना, विभागांना मिळालेला निधी, सुरू असलेले काम, योजना, लाभार्थ्यांची माहिती घेण्यात आली. विभागनिहाय प्रत्येक अधिकाऱ्याने पीपीटीद्वारे आढावा सादर केला. प्रत्येक विभागाच्या कामावर अर्धा तास चर्चा झाली. काही अधिकारी व कर्मचारी शनिवारी सुटी असतानाही दुपारी अडीच वाजेपर्यंत थांबून होते. दरम्यान, सोमवारी विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतील. त्यामुळे सीईओ भुवनेश्वरी एस यांनी पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद आणि जिल्ह्याची सविस्तर माहिती घेतली. त्यामुळे बैठक लांबली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...