आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातळोद्यात हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या निमित्ताने दुचाकी रॅली काढण्यात आली. यातून सभेविषयी जागृती निर्माण करण्यात आली. हिंदूंवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी तसेच हिंदू राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ११ डिसेंबर रोजी माळी समाज मंगल कार्यालय, तळोदा येथे सायंकाळी ५:३० वाजता हिंदू राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर ही रॅली काढण्यात आली. प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात धर्मध्वजाचे पूजन करून आणि वाहन फेरीत सहभागी झालेल्या युवकांवर फुलांची उधळण करून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रारंभी धर्मध्वजाचे पूजन करून श्रीदत्त मंदिरापासून आरंभ करण्यात आला. नंतर काका शेठ गल्ली मार्गे बिरसा मुंडा चौकात आल्यावर वसंत पाटील यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वाहन फेरी पुढे निघाली. खान्देश गल्ली गणपती गल्ली ठाणे घर गल्ली मोठा माळीवाडा हनुमान मंदिर संविधान चौक एबी चौक या मार्गाने येऊन माळी समाज मंगल कार्यालयात वाहन फेरीची सांगता करण्यात आली. त्या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीचे अमोल वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. या वाहन फेरीत २५० वाहनधारक सहभागी झाले होते.
सुनील घनवट, रागेश्री देशपांडे प्रमुख वक्ते
रविवारी होणाऱ्या सभेत सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक सुनील घनवट आणि हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या रागेश्री देशपांडे हे वक्ते आहेत. ते या सभेत मार्गदर्शन करणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.