आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम‎:शिरपूरला शिक्षकांनी घडवले संस्कृतीचे‎ अनोखे दर्शन; भोंदूगिरीवरही प्रकाशझोत‎

शिरपूर‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आर.सी. पटेल इंग्रजी माध्यमिक‎ विद्यालयात बालदिवसानिमित्त कार्यक्रम‎ झाला. या वेळी बचपन मेला हा उपक्रम‎ राबवण्यात आला. तसेच शाळेतील‎ शिक्षकांनी देशातील १५ राज्यांतील‎ नागरिकांप्रमाणे वेशभूषा करून‎ संस्कृतीचे दर्शन घडवले.‎ कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहिले‎ पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू‎ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या‎ वेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल‎ भंडारी, स्कूल कमिटीचे चेअरमन योगेश‎ भंडारी, सीईओ डॉ. उमेश शर्मा,‎ विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल परब,‎ मुख्याध्यापिका मनीषा एॅड्रीएज,‎ मुख्याध्यापिका मधुबाला राही उपस्थित‎ होते. शिक्षकांनी विनोदी नाटिका,‎ भोंदूगिरीवर कार्यक्रम सादर केला.‎ विज्ञानाचा बोध नाटिका सादर करण्यात‎ आली.

कार्यक्रमाला प्राचार्य डॉ‌. अमोल‎ परब यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात‎ पाचवी ते आठवीच्या १ हजार २००‎ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विविध‎ खेळ झाले. श्याम पाटील, पंकज बागुल,‎ संदेश साळुंखे यांनी संयोजन केले. रवी‎ सोनगिरे, शुभांगी पाटील यांनी‎ सूत्रसंचालन केले. ललित सोनवणे‎ यांनी आभार मानले. शाळेत‎ विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना‎ मिळावी या उद्देशाने विविध उपक्रम‎ राबवण्यात येतात.

बातम्या आणखी आहेत...