आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:गोरगरिबांसाठी युवासेनेतर्फे‎ एक करंजी मोलाची उपक्रम‎

धुळे‎5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरिबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने‎ युवा सेनेतर्फे दरवर्षी एक करंजी लाख मोलाची उपक्रम राबवला जातो. त्यानुसार यंदाही हा उपक्रम राबवण्यात आला. या ‎उपक्रमांतर्गत फराळाचे पदार्थ जमा ‎करण्यासाठी मदत फेरी काढण्यात आली.‎ शिवसेना-युवासेनेतर्फे एक करंजी,‎ कपडे, स्वेटर लाख मोलाचे या‎ उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त फराळ,‎ कपडे, स्वेटर जमा व्हावे यासाठी पहिली‎ मदत फेरी पेठ विभागातून काढण्यात‎ आली.

फराळ, कपडे-स्वेटर जमा‎ झाल्यावर त्यांचे गरिबांना वाटप होणार‎ आहे. युवासेनेचे पंकज गोरे यांनी सुरू‎ ‎केलेल्या उपक्रमाला दहा वर्षे झाले आहे.‎ मदत फेरीत युवासेनेचे जिल्हाप्रमुख संदीप‎ मुळीक, उपजिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील,‎ शहरप्रमुख आकाश शिंदे, उपशहरप्रमुख‎ प्रेम सोनार आदी सहभागी झाले.‎

बातम्या आणखी आहेत...