आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन:वेळ वाया घालवणे हा पैश्यांचा ठरतो अपव्यय; शितोळे यांचे मत

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वेळ अमुल्य असतो. तो वाया घालवणे म्हणजे पैश्यांचा अपव्यय करण्यासारखे आहे. त्यामुळे वेळ सदुपयोगी लागेल यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन राज्याच्या माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शिताेळे यांनी केले.येथील धुळे एज्युकेशन साेसायटीचे मा. ध. पालेशा वाणिज्य महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी एसएनडीटी महमाविद्यालयाचे प्रा. तथा करिअर कट्टा तालुका समन्वयक प्रा. डाॅ. राजेंद्र ब्राह्मणे, महाविद्यालयाच्या करिअर कट्टाचे समन्वयक प्रा. डाॅ. हेमंत जाेशी, प्रभारी प्राचार्य बी. एस. काळे आदी उपस्थित होते.

यशवंत शिताेळे म्हणाले की, महाविद्यालयीन जीवनात वेळेचे नियाेजन केले पाहिजे. करिअर कट्टा या उपक्रमातंर्गत शासनातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. प्रभारी प्राचार्य बी. एस. काळे म्हणाले की, करिअर कट्टा उपक्रमात महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. त्यासाठी लागणरारे सर्व प्रकारचे सहकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक करण्यास तयार आहे. विद्यार्थ्यांनी भविष्याचा अंदाज घेऊन करिअर निश्चित करावे, असेही ते म्हणाले. वरिष्ठ प्रा. बी. बी. बारसे, प्रा. एम. एम. मून, ग्रंथपाल डाॅ. सी. डी. वाणी, प्रा. आर. व्ही. उपासनी, प्रा. एच. एस. जैन उपस्थित हाेते. प्रा. पी. एच. बडगुजर यांनी आभार मानले. प्रा. यु. ए. वाणी यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...