आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदाज:10 अंशांपेक्षा कमी असेल एक आठवडा तापमान ; शहराचे तापमान 9.6 अंशांवर, हुडहुडी वाढली

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे किमान तापमान रविवारी ९.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. दाेन दिवसांपासून तापमान १० अंशांच्या खाली गेल्याने गारठा वाढला अाहे. पुढील आठवडाभर किमान तापमान १० अंशांखाली राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे धुळेकरांना किमान आठ दिवस तरी दिलासा मिळणार नसल्याचे चित्र आहे.

शहरात काही दिवसांपासून पुन्हा गारठा वाढला आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात थंडी गायब झाली हाेती. डिसेंबरमध्ये काही वेळा किमान तापमान १० अंशांच्या खाली तर काही वेळा ते १५ अंशांवर हाेते. त्यामुळे फारशी थंडी जाणवत नव्हती. त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडी पुन्हा परतली. शहरात ३१ डिसेंबरला १०.२ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली होती. ते राज्यातील सर्वात कमी तापमान होते. त्यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारीला किमान तापमान ९.६ अंश व कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस होते.

किमान तापमानात घट झाल्यामुळे रात्रीच्या वेळी वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमान १० अंशांच्या खाली राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात ७ दिवस किमान तापमान १० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले होते. तसेच १७ डिसेंबर ३३ अंश कमाल तापमानाची नोंद झाली होती. ते डिसेंबरमधील सर्वाधिक तापमान होते. थंडी वाढल्याने आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...