आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीत तरुणाने घेतली उडी:पुलावर दुचाकी ठेवत तापी नदीत तरुणाने घेतली उडी

शिरपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील टेंभे येथील तरुणाने तापी नदीवरील गिधाडे येथील पुलावरून नदीत उडी घेतली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. तरुणाचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते.तापी नदीवरील गिधाडे पुलावरून सायंकाळी पाच वाजता तरुणाने उडी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी बघितले.

या तरुणाला पोहता येत नव्हते. उडी घेण्यापूर्वी तरुणाने दुचाकी एमएच-१८-बीके-८२५१ पुलावर उभी केली होती. चौकशीनंतर या तरुणाचे नाव सुरेंद्रसिंग सरदारसिंग राजपूत (वय २४) असल्याचे उघडकीस आले. तो एका बियाण्याच्या कंपनीत नोकरी करत होता. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस आले. तरुण नदीत उडी घेत असल्याची घटना काहींनी मोबाइलमध्ये चित्रित केली.

बातम्या आणखी आहेत...