आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:8 लाख 2 हजार मतदारांचे आधारकार्ड लिंक

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मतदारांची ओळख प्रस्थापित करणे, मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे, एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकाच मतदारसंघात एकाच व्यक्तीचे दोन वेळा नाव असल्यास ते वगळता यावे यासाठी मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक लिंक केले जात आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ८ लाख २ हजार ४६५ मतदारांनी मतदान कार्डला आधार क्रमांक लिंक केला आहे. मतदानासाठीच्या आवश्यक असणाऱ्या १४ पुराव्यांमध्ये मतदान कार्डचा समावेश आहे. पूर्वीच्या मतदान ओळखपत्रात आता निवडणूक आयोगाने बदल केला आहे. आता मतदारांना रंगीत ओळखपत्र देण्यात आले आहे. व्यवहारात प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची गरज भासते. त्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान कार्डला आधार क्रमांक लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान ओळखपत्र आधार कार्डला लिंक करण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबवली जाते आहे. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात १६ लाख ९९ हजार ३५३ मतदार आहेत.

त्यापैकी ८ लाख २ हजार ४६५ मतदारांनी मतदान कार्डला आधार क्रमांक लिंक केला आहे. अद्याप ८ लाख ९६ हजार ८८८ मतदारांनी मतदान कार्डला आधार क्रमांकाला लिंक केलेला नाही. मतदारांचा आधार तपशील सार्वजनिक होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी आधार क्रमांक लिंक करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आधार लिंकिंग ऐच्छिक
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील कलम २३ नुसान मतदानकार्ड आधार क्रमांकाशी लिंक करणे ऐच्छिक आहे. ज्यांना आधार क्रमांक लिंक करायचा आहे त्यांच्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू आहे.

काय आहेत कायद्यातील तरतूद : निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन विधी व न्याय मंत्रालयातर्फे निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम २०२१ अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा केल्या आहे. त्यानुसार कलम २३ नुसार मतदारांना मतदार यादीतील तपशिलाशी आधार लिंक करता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...