आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना:पोषण आहार हवा असेल तर आधार क्रमांकही बंधनकारक ; विद्यार्थ्यांची आधार जोडणीच नाही

तऱ्हाडीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक शासकीय पोर्टलवर नोंदवला असेल त्यांनाच १ जानेवारी २०२३ पासून शालेय पोषण आहार दिला जाईल. त्यामुळे शासकीय पोर्टलवर आधार क्रमांक नोंदवण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांसह पालकांची धावपळ सुरू आहे. शिरपूर तालुक्यात पहिली ते आठवीच्या ५३ हजार १५४ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. त्यापैकी अद्याप ८ हजार विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पोर्टलवर झालेली नाही. ज्यांची आधार नोंदणी होणार नाही त्यांना पोषण आहार मिळणार नाही.

शिरपूर तालुक्यात ३५७ शाळा आहेत. या शाळेत पहिली ते आठवीच्या ५३ हजार १५४ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाकडे डिसेंबरअखेर आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. त्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी गर्दी होते आहे. तालुक्यातील सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांच्या आधारची नोंद अद्याप झालेली नाही. तसेच काहींच्या नावात चुका आहे. दुसरीकडे तालुक्यात आधार नोंदणी केंद्राची संख्या कमी आहे. ज्या शाळेत आधार कार्ड काढण्यासाठी शिबिर घेतले जाते त्या शाळेत पालक येत नाही.

तालुक्यात ५३ हजार लाभार्थी
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २६८ शाळा असून त्यात पहिली ते पाचवीचे २२ हजार ७९२, सहावी ते आठवीचे ८४४ असे एकूण २३ हजार ६३६ लाभार्थी आहे. खासगी प्राथमिक शाळा २० असून, त्यात पहिली ते पाचवीचे ५ हजार ५१४, सहावी ते आठवीचे ८११ असे एकूण ६ हजार ३२५ लाभार्थी आहे. तालुक्यात खासगी माध्यमिक शाळा ५५ आहे. त्यात पहिली ते पाचवीचे ४ हजार ८२२, सहावी ते आठवीचे १६ हजार ३७५, एका खासगी आश्रमशाळेत पहिली ते पाचवीचे ९६, सहावी ते आठवीचे ६२, चार बाल कामगार शाळेत सहावी ते आठवीचे १५१, नगरपालिकेच्या नऊ शाळेत पहिली ते पाचवीचे १ हजार ३६५, सहावी ते आठवीचे ३२२ लाभार्थींना शालेय पोषण आहाराचा लाभ मिळतो. तालुक्यात पहिली ते पाचवीच्या एकूण ३४ हजार ५८९ व सहावी ते आठवीच्या १८ हजार ५६५ विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळतो, अशी माहिती देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...