आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:कापडणे गावात डेंग्यूची खबरदारी म्हणून ॲबेटिंग

कापडणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावात डासांचे प्रमाण वाढू नये व डेंग्यू पसरू नये म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ॲबेटिंग मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य कर्मचारी धनराज पाटील यांचे पथक घरोघरी जाऊन पाण्यात औषध टाकून जनजागृती करीत आहेत.

या मोहिमेत घरोघरी जाऊन नागरिकांना आठवढ्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, घराजवळ व परिसरात स्वच्छता ठेवणे आदी मार्गदर्शन केले जात आहे. आरोग्य सेवक धनराज पाटील यांना नुकतेच पंतप्रधान कार्यालयातून सतत चांगले काम केल्याचे कौतुकाचे पत्र प्राप्त झाले आहे. तर कामाचा शुभारंभ पुन्हा धनराज पाटील यांनी गावात ॲबेटिंग मोहीम राबवून केला. आरोग्य विभागाच्या वतीने कंटेनर सर्व्हे, दूषित कंटेनरमध्ये अबॅटिंग टाकणे, कंटेनर खाली करणे, डेंग्यू अळी विषयी जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत वैशाली चौधरी, आशा कर्मचारी सुनीता माळी, वैशाली बोरसे, आशा पाटील, भटाबाई पाटील आदी उपस्थित आहेत.

बातम्या आणखी आहेत...