आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:चारचाकी वाहन वाचवण्याच्या प्रयत्नात बस पडली खोल दरीत

शहादा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य परिवहन महामंडळाच्या बसला शहादा-धडगाव रस्त्यावर अपघात झाला आहे. वळण रस्त्यावर चारचाकी वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात बस खोल नाल्यात पडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाची शहादा बस (एमएच २०, आरएल ३५१६) ही धडगावहून चालक अरविंद सावताळे हे १.३० वाजता शहाद्याकडे घेऊन येत असताना कार्कदा गावाजवळील देवबारी घाटात अपघात झाला आहे. या बसमध्ये धडगाव येथून २५ प्रवासी बसले होते. परंतु चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांचा जीव वाचला आहे.

बातम्या आणखी आहेत...