आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:शहाद्यात उघड्या गटारीमुळे होताय अपघात, तरीही दुर्लक्ष

शहादा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ मुख्य रस्त्याला लागून असलेली शहादा नगरपालिकेची गटार सध्या अपघाताचे ठिकाण बनले असून अपघाताची मालिका सुरूच आहे. दोन ठिकाणी गटार उघडी असल्याने वाहनांची चाके त्याच्यात घुसून अपघात होतात एखादा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.

शासकीय विश्राम गृहपासून सरळ जुना मोहिदा रस्ता गणेशनगर पर्यंत गटारीचे बांधकाम केले आहे. स्वामी समर्थ केंद्रा जवळ दोन ठिकाणी गटार खुली ठेवली आहे. वास्तविकता जाड लोखंडी जाळी अथवा इतर व्यवस्था करून बंद केली पाहिजे होती. दिवसा काय आणि रात्री काय वाहनधारकांना लांबून खुली असलेली गटात दिसत नसल्याने सरळ वहाने जाऊन त्याच्यात आदळतात.

महिन्याभरात दहा ते बारा कार व चार चाकी वाहने आदळून अपघात झाले आहेत. उघड्या ठेवलेल्या जागा बंदिस्त कराव्यात, अशी मागणी आहे. मुख्याधिकारी दिनेश सिनारे, बांधकामचे शाखा अभियंत्यांनी प्रत्यक्ष त्या जागी भेट देऊन पाहणी करून उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...