आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:नेशन बिल्डर पुरस्कार देत 50 शिक्षकांच्या कामगिरीचा गौरव

धुळे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोडतर्फे शिक्षक दिनानिमित्त पन्नासपेक्षा अधिक शिक्षकांना नेशन बिल्डर अवाॅर्ड देण्यात आला. शहरातील दाते रिजेन्सी येथे हा कार्यक्रम झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, रोटरी डिस्ट्रिक्ट लिटरसी चेअर नीलेश शहा, पीडीजी आशिष अजमेरा, अॅड. संजय शिंपी, रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोडचे अध्यक्ष दिनेश खंडीकर, सचिव राजेश जोशी, संतोष बिरारी, प्रोजेक्ट चेअर प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील उपस्थित होते.

या वेळी अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य व विज्ञान, औषधनिर्माण, दंतवैद्यकीय, वैद्यकीय व कृषी विद्या शाखेतील ५५ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. वर्ग समन्वयक संतोष बिरारी यांचा विशेष सन्मान झाला. नीलेश शहा यांनी मार्गदर्शन केले. दिनेश खंडीकर यांनी प्रास्ताविक केले. संतोष बिरारी यांनी कार्यक्रमाची संकल्पना विषद केली. सागर थोरात यांनी सेरमनी कॉल टू अॉर्डर केले. राजेश जोशी यांनी फोर वे टेस्ट सादर केले. रोटरी क्लब ऑफ धुळे फेमिनाच्या अध्यक्षा मेघा कामेरकर, अनिता पाटील उपस्थित होत्या. भविता देवरे, राजश्री चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धनाथ गरुड, कमर शेख, नीतेश सराफ, दीपक अहिरे, अशोक तोटे, हेरंब दाते, विलास कामेरकर यांनी संयोजन केले.

बातम्या आणखी आहेत...