आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:निवृत्त क्रीडा शिक्षकांच्याही कार्याची दखल

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघातर्फे शिक्षक व क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील निवृत्त क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.निकम इन्स्टिट्यूटचे रवींद्र निकम अध्यक्षस्थानी होते. जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजित भोसले, भोसले, शुभांगी पाटील, राज्य कोअर कमिटीचे सदस्य अध्यक्ष डी. बी. साळुंखे, महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. आनंद पवार, शहराध्यक्ष आर. बी. शिंदे, सचिव भूपेंद्र मालपुरे, शिरपूर तालुकाध्यक्ष मनोज पाटील, सचिव राधेश्याम पाटील, शिंदखेडा तालुकाध्यक्ष सतीश भदाणे, धुळे तालुका सचिव टी. के. पाटील, माजी जिल्हा उपाध्यक्ष डी. झेड. पाटील, ज्येष्ठ शिक्षक ए.बी. खांडेकर, हिरामण चौरे, राजेंद्र बारे, ए.डी. साळुंखे, जिल्हा कार्यकारी सदस्य एस.के. नेरकर, महेश पाटील, अभिजित भामरे उपस्थित होते.

जिल्ह्यातील २१ निवृत्त क्रीडा शिक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यात शिरपूरचे प्राचार्य व्ही.एस. मराठे, के. पी. पाटील, टी. टी. बडगुजर, व्ही.ए. पाटील, व्ही.डी. देसले, एल.आर. नांद्रे, एस.एस. भदाणे, व्ही.जी. एखंडे, आर.एन. देसले, आर. एन. पाटील, आर.के. पाटील, बी. डी. खलाणे, ए. टी. वाघ, आर. एस. नांद्रे, एस. एफ. शिरोडे, व्ही. डी. पाटील, सत्तू गावित, शेख सलीम शेख, मन्सुरी शेख सलीम, शकील कुरेशी यांचा समावेश होता.डॉ. आनंद पवार यांनी सूत्रसंचालन केले. भूपेंद्र मालपुरे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...