आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराजवळील अवधान एमआयडीसीचा रावेर येथे विस्तार करण्यास मंजुरी देण्यासह ९८ हेक्टर जागा अधिग्रहित करावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव येथे झालेल्या आढावा बैठकीत केली. तसेच धुळे शहरातील विकास कामांचे प्रस्ताव मंजूर होण्यासाठी संबंधित विभागाने पाठपुरावा करावा, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक विभागाची आढावा बैठक मालेगाव येथे शनिवारी झाली.
या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार दादा भुसे, फारुक शाह, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त देविदास टेकाळे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील रस्त्यांची परिस्थिती सुधारावी. नवीन कामांचे प्रस्ताव पाठवावे. कामे गुणवत्तापूर्ण होतील, याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी. धुळे शहरातील नवीन भूमिगत गटार योजना व देवपूर भागातील नवीन रस्ते व महापालिकेच्या हद्दवाढीतील अकरा गावांमध्ये कामे करण्यासाठी ३४९ कोटींच्या निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे. या प्रस्तावांचा पाठपुरावा करावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
प्रकाशा-बुराई योजनेला सुप्रमा देत योजनेला गती : उपमुख्यमंत्री फडणवीस
शिंदखेडा व नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणाऱ्या प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता असून, ती देण्यात येईल व कामाला गती देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विविध कार्यक्रमांसाठी ते दोंडाईचा दौऱ्यावर आले असता बोलत होते. माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार अमरीशभाई पटेल, सरकारसाहेब रावल, नगराध्यक्षा नयनकुंवर रावल (उर्वरित पान पान २ वर)
सरकारसाहेबांनी दातृत्वाचा वारसा जोपासला
उद्योगपती सरकारसाहेब रावल यांचा अमृतमहोत्सवी सोहळा, दादासाहेब रावल उद्योगसमूहाचा सुवर्ण महोत्सव, स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचा शताब्दी महोत्सव व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ७५ फुटी ध्वजस्तंभाचे लोकार्पण झाले. खान्देशात रावल गढीचा ऐतिहासिक असा वारसा असून या घराण्याचा कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा व दातृत्वाचा वारसा सरकारसाहेब रावल यांनी जोपासण्याचे काम केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.