आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

साक्री:नवीन विज मीटरसाठी चार हजारांची लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक अभियंत्यावर कारवाई

साक्री2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, पिंपळनेर (ता.साक्री) येथील सहाय्यक अभियंता संजय कौतिक माळी (वय-५१) यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चार हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.दरम्यान या कारवाईचे पिंपळनेर शहरात स्वागत केले जात आहे.

पिंपळनेर शहरातील सटाणा रोड या भागातील एका ४३ वर्षीय व्यक्तीस नवीन घरगुती वापरासाठी नविन मीटर घेणे असल्याने त्यांना नवीन मिटर मिळून देण्यासाठी तक्रारदार यांच्या कडून आज वीज मीटर देण्याच्या मोबदल्यात ४ हजार रुपयांची सहाय्यक अभियंता संजय कौतिक माळी यांनी पंच साक्षीदार समक्ष केली. त्या अनुषंगाने सापळा रचून कारवाई केली असता,आरोपी सहाय्यक अभियंता संजय कौतिक माळी यांनी तक्रारदार यांचे कडून आज रोजी पंचांसमक्ष ४ हजार रुपये रक्कम स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी स्वीकारली. त्यामुळे पंच साक्षीदार समक्ष आरोपी लोकसेवक यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक सुनील कडासने,अपर पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक ला.प्र.वि.धुळे,सहा. सापळा अधिकारी मंजीतसिंग चव्हाण पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.धुळे पर्यवेक्षण अधिकारी,सुनील कुराडे पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि.धुळे,सापळा पथकात संदीप सरग,सुधीर सोनवणे, प्रशांत चौधरी,कृष्णकांत वाडीले, भुषण शेटे यांच्या पथकाने केली आहे.

कारवाईचे सर्वत्र होत आहे स्वागत:- "कारवाई करण्यात आलेल्या सहायक अभियंत्याच्या संदर्भात पिंपळनेर शहरातील अनेक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता कारण त्यांच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या कोणत्याही प्रकारच्या शिल्लक कामासाठी देखील ग्राहकांची पिळवणूक करण्यासह अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन काम करण्याची पद्धत संबंधित आरोपी लोकसेवकाची होती. त्यामुळे प्रचंड त्रासाचा सामना नागरिकांना करावा लागत होता मात्र त्याची तक्रार करण्याचे धाडस कोणीही करत नव्हते अखेर आज बुधवार रोजी या अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली असून या कारवाईचे पिंपळनेरच्या नागरिकांमध्ये स्वागत केले जात आहे".